shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा बँक निवडणुकीसाठी एरंडोल येथे 94:54% मतदान,110 मतदार पैकी 104 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जळगाव जिल्हा प्रतिनिधी- प्रमोद चौधरी
सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१
एरंडोल:- जिल्हा बँक निवडणूकीसाठी आज 110 मतदार पैकी 104 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सोसायटी मतदार संघातील 33 मतदारांपैकी 32 मतदान केले तर एक मतदार गैरहजर होता. इतर संस्था व व्यक्तिगत 77 मतदारांपैकी 72 मतदारांनी मतदान केले तर 5 मतदार हे गैरहजर होते. गैरहजर असलेल्या मतदारांमध्ये भाजपा महाराष्ट्र राज्य जणजातीय संपर्कप्रमुख अँड किशोर काळकर हे पक्षाच्या कामानिमित्त बाहेर राज्यात गेल्यामुळे मतदानास येऊ शकले नाहीत यांचेसह 2 मतदार हे आजारी असल्यामुळे,2 मतदार हे लग्नासाठी बाहेरगावी असल्यामुळे व 1मतदार हे वैयक्तिक कामानिमित्त मतदानासाठी येऊ शकले नाहीत .आज एरंडोल येथे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक अमोल पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन जि प सदस्य नाना भाऊ महाजन, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांचेसह अनेक मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर उमेदवार डॉ. सतीश पाटील, यांनी दुपारी येऊन भेट दिली तर महा विकास आघाडीचे नेते अमोल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, राजेंद्र शिंदे, पराग पवार, नगरसेवक अभिजीत पाटील, सुदाम पाटील, आर डी पाटील, दत्तू पाटील यांचेसह कार्यकर्ते व पदाधिकारी हे मतदान केंद्रावर हजर होते.
मतदान केंद्रात केंद्रप्रमुख संजय पाटील, बाळासाहेब देशमुख, एस जी ठाकूर,सौ एस सी साळुंके,व्ही बी पवार, किरण दुसाने टी एफ बाविस्कर यांनी मतदान केंद्रात परिश्रम घेतले.
close