शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जळगाव जिल्हा प्रतिनिधी- प्रमोद चौधरी
सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१
एरंडोल:- येथे सैय्यद वाडा परिसरात 30 वर्षीय विवाहितेने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.याबाबत सविस्तर माहिती अशी की सय्यद वाडा परिसरात रहिवासी असलेले अकील पिंजारी पत्नी फिरोजा अकील पिंजारी दोन मुली व एक लहान मुलगा असे राहतात.शुक्रवार पासून पती अकील अब्दुल पिंजारी हे तवेरा गाडीवर चालक म्हणून दमन गुजरात येथे गेले होते यांची मोठी मुलगी मुस्कान ही जळगाव येथे आपले मामाच्या घरी गेल्या 15 दिवसापासून गेलेली आहे.
घरी दुसऱ्या मजल्यावर फक्त फिरोजा पिंजारी ,मुलगा व मधली मुलगी असे होते. खालच्या मजल्यावर मोठा भाऊ शकील पिंजारी हा राहत आहे यांची मुलगी सानिया हिने पाहिले काकू फिरोजा पिंजारी वय 30 वर्षे हिने किचन मधील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पाहिले म्हणून वडील शकील पिंजारी हे कजगांव त्याचे व्यापार च्या कामानिमित्त जात असतांना त्यांची मुलगी सानिया हीचा फोन आला व तिने सांगितले की, फिरोजा काकु ने घरात गळफास घेतला आहे.
म्हणून शकील पिंजारी हे लागलीच परत पुन्हा घरी आलो तेव्हा त्यांचे घराचे वरच्या मजल्यावर किचन मध्ये जावुन पाहीले असता त्यांचे लहान भाऊ अकील पिंजारी याची पत्नी नामे फिरोजा अकील पिंजारी वय-30 वर्ष घराचे छताला दोरी बांधुन गळफास घेतलेला होता. गल्लीतील इतर नागरिक व नगरसेवक अस्लम पिंजारी माजी नगरसेवक एजाज अहेमद व इतरांनी मिळून फिरोजा पिंजारी यांना खाली उतरून तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. मुकेश चौधरी यांनी त्यांच्यावर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान मयत फिरोजा पिंजारी याच्या पश्चात इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली मुस्कान ही तेरा वर्षाची मुलगी तसेच आसमाबी ही इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली दहा वर्षाची मुलगी तसेच इयत्ता पहिली मध्ये शिकत असलेला सात वर्षाच्या मुस्कान नावाचा मुलगा आहे. फिरोजा चे पती अकील मुजावर हे मोसंबीच्या व्यापार,शेती करून दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून बदलीवर जात असतात.विवाहीतिचे पती हे बाहेरगावी असल्यामुळे ते रात्री 9 वाजता घरी आल्यामुळे तेव्हा त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात शकील अब्दुल पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलीस स्थानकात रजि नं-53/2021सी आर पी सी 174प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहे.

