युवा शिबीर -२०२१ जीवनाचे व्यवस्थापन आणि चार पुरुषार्थ
प्रतिनिधी : रवि भगत
मुरगुड : २२ / भारतीय जीवनशैलीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ संकल्पनेच्या आधारे भारतीय दृष्टिकोनातून जीवनाचे व्यवस्थापन करण्याविषयी विश्व मराठी परिषदेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड या गावी दोन दिवसीय मोफत निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
प्रवेश निःशुल्क असून मर्यादित प्रवेश ३५ पेक्षा कमी वयोगटातील युवक युवतींसाठी रहाणार आहे. या शिबिरामध्ये करियर, अर्थ, कुटुंब, नातेसंबंध, चरित्र, चारित्र्य, मैत्री, व्यवहार याद्वारे एकूणच जीवनाचे यशस्वी व्यवस्थापन याविषयी विविध विद्वानांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. तसेच पदभ्रमण, चर्चा, गप्पा, प्रश्नोत्तरे याद्वारे या विद्वानांसोबत थेट संवाद साधता येणार आहे .
प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख प्रख्यात प्रवचनकार, लेखक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक , तसेच मार्गदर्शक राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे, प्रसिध्द करिअर मार्गदर्शक श्री. विवेक वेलणकर ,प्रख्यात लेखक आणि वक्ता प्रा. क्षितिज पाटुकले यांचे अंतर्गत व मार्गदर्शनाने शिबिर होणार आहे .
या शिबिराचा कालावधी ११ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासून ते १२ डिसेंबर संध्या. ७ पर्यंत असून शिबिरार्थी संख्या १०० ते १२० मर्यादित असून निः शुल्क पूर्व नोंदणी आवश्यक आहे . मात्र प्रवासाचा, जाण्यायेण्याचा खर्च शिबिरार्थीने स्वतः करायचा आहे.
शिवगड हे ठिकाण कोल्हापूर पासून 40 किमी अंतरावर कागल तालुक्यातील मुरगुड या गावी एका विस्तीर्ण जलाशयाकिनारी वसलेले अतिशय रमणीय आणि निसर्गरम्य असे स्थान आहे.
ऑनलाईन नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/yuvashibir2021
या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करा. निवडलेल्या व्यक्तींची यादी 30 नोव्हेंबर रोजी वेबसाईटवर जाहीर केली जाईल आणि ईमेल / व्हॉटसअप द्वारे कळविले जाईल.
नोंदणीची अंतिम तारीख : 27 नोव्हेंबर, 2021 आहे . व्हॉटसअपवर संपूर्ण महितीपत्रक मागविण्यासाठी 7066251262 या क्रमांकावर युवा शिबीर 2021 असा संदेश पाठवा .
संपर्क :
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद
मोबाईल : 7066251262

