शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जळगाव जिल्हा प्रतिनिधी- प्रमोद चौधरी
सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१
एरंडोल: केंद्र शासनातर्फे मागील वर्षापासून सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०-२१ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण व कचरा मुक्त शहर या अभियानाचे नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या आजचे वीस नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
एरंडोल शहर आने कचरा मुक्त शहर या घटकांमधील 3 स्टार मानांकन प्राप्त करून एरंडोल नगर परिषदेचा सन्मान राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकार सचिव दुर्गाशंकर मिश्रा व सहसचिव रूपा मिश्रा यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन एरंडोल नगरपालिकेचा बहुमान प्रदान करण्यात आला. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी तथा सध्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी नाशिक किरण देशमुख विद्यमान मुख्य अधिकारी विकास नवाळे कार्यालय अधीक्षक हितेश जोगी आरोग्य निरीक्षक अनिल महाजन मुकादम आनंद दाभाडे हे उपस्थित होते.
वेस्ट झोन मधून२८क्रमांक
वेस्ट झोन मधून एरंडोल नगरपालिकेला २८वा क्रमांक प्राप्त झाला.सदर बहुमान बाबत एरंडोल नगरपालिकेचे अध्यक्ष रमेश सिंग परदेसी मुख्याधिकारी विकास नवाडे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की वेस्ट झोनमध्ये ३०४ नगरपालिकांनी सहभाग नोंदविला होता त्यात एरंडोल नगरपालिकेने पहिल्या पन्नास मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.
एरंडोल शहर हे प्लास्टिक मुक्त शहर म्हणून घोषित
याकामी विभाग स्तर व जिल्हास्तर एरंडोल नगरपालिका प्रथम तर राज्यस्तरावर पहिल्या दहामध्ये येण्याची शक्यता आहे सदर सर्वेक्षणामध्ये एरंडोल नगरपालिकेने पाच घंटागाड्या द्वारे घरोघरी जाऊन ओला-सुका घरगुती घातक कचरा व प्लास्टिक अशाप्रकारे कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण करून संकलन केले आहे व अजूनही ते करीत आहेत यामध्ये एरंडोल नगरपालिकेने प्लास्टिक गोळा व जप्त करून एरंडोल शहरात प्लास्टिक मुक्त देखील करण्याचा प्रयत्न सुरूआहे. एरंडोल शहर हे प्लास्टिक मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.नगराध्यक्ष रमेश सिंग परदेसी पुढे म्हणाले की शहरातील नागरिकांना यापूर्वी अवाजवी ४ टक्के विकास कराची आकारणी करण्यात आली असता सदर विकास कर एक टक्के इतका कमी करण्यात आला आहे .कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव असल्याने बर्याच नागरिकांचे रोजगार व उद्योगधंद्यांमध्ये घट झाल्याने या वर्षी होणारी चतुर वार्षिक कर आकारणी सध्यास्थितीत स्थगित ठेवण्यात आलेली असून वाढीव कर आकारणी करण्यात आलेली नाही .
"माझी वसुंधरा अभियाना"
“माझी वसुंधरा अभियाना बद्दल नगराध्यक्ष परदेशी म्हणाले की ज्या नागरिकांनी रेन वाटर हार्वेस्टिंग केली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट, सोलर इलेक्ट्रिक सिस्टीम कार्यान्वित केलेली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट, होम कम्पोस्टिंग केली असेल त्यांना एक टक्के सूट, आपल्या स्वमालकीच्या जागेत किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले असल्यास त्यांना एकत्रित मालमत्ता करातून एक टक्के सूट व ज्या इमारतीस शासन मान्य अभि करना करून हरित इमारत म्हणून घोषित करण्यात आली असेल त्यांना एकत्रित मालमत्ता करातून पाच टक्के सूट देण्याचा ठराव नगरपालिकेने पारित केला आहे . याबाबतची अंमलबजावणी २०-२२-२३ संबंधित पात्र लाभार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे एरंडोल नगरपालिकेतर्फे नर्सरी तयार करण्यात येत असून जे नागरिक वृक्षसंवर्धन नाकरता इच्छुक असतील अशा नागरिकांना रोपांचे देखील वाटप करण्यात येणार आहे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
सहकार्य
एरंडोल नगरपालिकेच्या शिरपेचात हा नवा बहुमान रोवला गेला असून त्यासाठी भाजपा विभागीय संघटन मंत्री एडवोकेट किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे सर्व अधिकारी सफाई कामगार सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शहरवासीयांनी सुद्धा मोलाचे सहकार्य या कामी केले.