हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोलीचे खा.हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दि.२४ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास सेनगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एक ही दिव्यांग बांधव प्रमाणपत्र व शासकीय योजनेच्या लाभापासुन वंचीत राहु नये या भावनेने खा.हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिर व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्याच अनुषंगाने दि.२४ नोव्हेंबर बुधवार रोजी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांची तपासणी व प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास सेनगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले आहे.

