shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू..!

एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल: NADCP अर्थात 'राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण, या कार्यक्रमांतर्गत दुसरी फेरी एरंडोल(erandol) तालुक्यात सुरू झालेली असून त्या साठी लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली आहे.
ही लस तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ व २ येथे उपलब्ध असून ६ शासकीय संस्था प्रमुख व अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून १४ खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत १०हजार ५०० जनावरांचे लसीकरण झालेले असुन. हे लसीकरण २१ दिवसात व जास्तीत जास्त ४२ दिवसांत पूर्ण करायचे आहे. ज्या जनावरांना मागच्या फेरीत टॅग (tag)लावलेले आहेत त्यांना पुन्हा टॅग करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या जनावरांना अद्याप टॅग लावण्यात आलेले नाहीत त्यांना टॅग लावणे बंधनकारक आहे तरी सर्व पशुपालक बांधवांनी आपल्या सर्व गाय वर्ग व म्हैस वर्ग जनावरांचे १००टक्के लसीकरण व टॅगींग करून घ्यावे.
४ते ८महिन्यांच्या वासरांना पहील्या महिन्यात बूस्टर (bustar)लस न विसरता करून घ्यावी व आपल्या पशुधनाचे या रोगापासून संरक्षण करावे व सदर मोहीम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.अशोक महाजन(पशुवैद्यकीय अधिकारी) एरंडोल यांनी केलेले आहे.सदरची मोहीम ही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सदाशिव सिसोदे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून या मोहीमेसाठी तालुक्यातील डॉ.अशोक महाजन,प्रेमराज पाटील,राहुल साळुंखे,सुभाष सोनवणे,रवींद्र चिंचोरे,हेमंत नागणे,शैलेश चौधरी तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
close