shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासींच्या मुलींची विक्री थांबवा-प्रा.मोतीलाल सोनवणे...!!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत. भिल व कोळी जमातीच्या अनेक शाखा आहेत. त्यात भिल, मावची, वळवी, पाडवी, पावरा, तडवी, कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर, पारधी, कोकणा हे आदिवासी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. मोल मजुरी करून, कष्ट करून उदरनिर्वाह करतात.

आदिवासी हा चारित्र्यवान आहे व इज्जतदार आहे. परंतु काही सवर्ण व अन्य लोकांनी पोटच्या मुली गर्भपात करून मारून टाकल्या. मुलींचे प्रमाण एकदम कमी झालं. त्यांच्या मुलांना ३५,४० वर्षाचे होईपर्यंत लग्नासाठी मुली मिळत नाही. आदिवासींच्या मुली विक्री करण्यासाठी एजंट, सबएजंट, तयार झाले आहेत. या एजंट लोकांच्या मार्फत आदिवासींच्या कमी वयाच्या मुलींची खरेदी विक्री जोरात चालू आहे. अथवा फूस लावून पळवून नेत आहेत. प्रत्येक गावात/ पाड्यात ४ ते ५ मुली सवर्णांचा घरात आलेल्या आहेत. आदिवासींच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. आपल्या इज्जतीवर त्यांनी घाला घातला आहे. यासाठी सर्व आदिवासींनी व आदिवासी संघटनांनी आपले आपसातील मतभेद विसरून एकत्र यावे. 

आदिवासी मुलींची विक्री थांबविणे बाबत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हाधिकारी साहेब यांना ताबडतोब निवेदन सादर करावे. व ज्या गावात मुली विकल्या गेल्या आहेत त्या प्रत्येक गावाच्या सर्वे करावा. व आदिवासींना न्याय मिळवून द्यावा आदिवासी विकास संघटनेच्यावतीने मी प्रा. मोतीलाल सोनवणे जाहीर आव्हान करत आहे.
close