shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण : ११६..; औषधी वृक्ष : टेटव/टेटू

पर्यावरण जनजागरण : ११६
औषधी वृक्ष : टेटव/टेटू

मराठीमध्ये टेटव या नावाने, हिंदीमध्ये श्योना, अरलू नावाने, संस्कृतमध्ये श्योनक, अर्लू नावाने आणि इंग्रजीमध्ये  Indian trumpet  flower या नावाने हा वृक्ष ओळखला जातो.

 टेटव/ टेटू या वृक्षाची साल व मूळ औषधीकरिता वापरले जाते. मुख्य उपयोग म्हणजे अंगावर आलेली सूज उतरविण्यासाठी आणि सूज आल्यामुळे होणारे दुखणे, वेदना बंद करण्यासाठी टेटूच्या सालाचा काढा करून सुजलेला अवयव, सांधे शेकवावेत. सर्व प्रकारची गरमी, मुळव्याध, अतिसार यासाठी टेटूच्या सालाचा काढा पोटात घ्यावा. टेटवचा काढा प्यायल्याने घाम येतो व त्यातून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. रक्तस्राव थांबविण्यासाठीदेखील टेटवचा काढा उपयुक्त आहे. सोलीसिडीक ऍसीडचे सर्व गुणधर्म टेटवमध्ये आढळून येतात.

जिभेची चव, कफ, आमवात, आतड्यातील कृमी, खोकला, ओकारी, तहान, श्वासनलिकेचा दाह, ताप, अमांश यावर टेटवचा काढा उपयुक्त आहे. टेटू/ टेटव  हा छोटा वृक्ष असून याला ओळखण्याची खूण म्हणजे सुमारे एक ते दोन फूट लांबीच्या चपट्या तलवारी सारख्या शेंगा या झाडाला येतात. शेंगांमध्ये  हलक्या वजनाच्या बिया असतात. त्यावर पांढरा पारदर्शक पापुद्रा असतो व शेंग उघडताच बिया व पापूद्रा वाऱ्याने उडून जातो.
टेटव वृक्षाची माहिती समजून घ्या व आपल्या मित्रपरिवाराला समजावून सांगा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण आरोग्य जनजागरण मोहिमेत सहभागी व्हा. 

लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक.
मोबाईल : ९८८१३७३५८५ 

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण मोहिमेंतर्गत प्रकाशित.
close