shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे युवा सेनेतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली......हेच आहेत का अच्छे दिन,- अमोल पाटील..!


               प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-  येथे युवासेना, शिवसेना तर्फे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन पारोळा बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
   यावेळी अमोल पाटील म्हणाले की "हेच का अच्छे दिन" केंद्र शासन दररोज पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांचे दररोज भाववाढ होत असल्यामुळे  सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या फटका बसत आहे त्याबद्दल आज युवा सेने तर्फे आम्ही केंद्र सरकारचा निषेध करीत सायकल रँली काढत आहोत.
   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन अमोल पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख बबलू पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते करून समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी भगवा झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत "केंद्र शासनाचा धिक्कार असो", "इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे",अश्या घोषणा युवा सैनिक देत
मेन रोडवर सायकल भ्रमण करून पंचायत समिती येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख व नगरसेवक कुणाल महाजन, युवा सेनेचे तालुका समन्वयक कमलेश पाटील, गांधी निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी भगत, माजी नगरसेवक नगरसेवक सुनील चौधरी, नितीन बिर्ला, राजेंद्र ठाकूर, सुभाष मराठे, विठ्ठल आंधळे, कृष्णा ओतारी, कुणाल पाटील, अमोल भावसार, मोहन महाजन,चंदू जोहरी, बापू मराठे, प्रणवराज पाटील, यांचेसह युवा सेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
.
close