shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांची कर्मयोगी कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वडापुरी ग्रामस्थांनी सत्कार करून केले अभिनंदन.

हर्षवर्धन पाटील यांची कर्मयोगी कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वडापुरी ग्रामस्थांनी  सत्कार करून केले  अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे शिवराज मेडिकल या ठिकाणी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची नुकत्याच झालेल्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुलेनगर बिजवडी या कारखान्याची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाली. हर्षवर्धन पाटील यांची चेअरमन पदी निवड झाल्याने वडापुरी गावातील ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा(दि.३१ ऑक्टोबर) रोजी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ,महेश शिर्के , दत्तात्रय गायकवाड,नारायण नलवडे ,बापू चंदनशिवे,राजेंद्र रेडेकर ,विठ्ठल कदम,सचिन काकडे,  श्याम थोरात, पंपू देवकर, दाउथ पठाण, सुनील जाधव, दत्तात्रय जाधव , संतोष देशमुख,शत्रुघ्न बागल, विलास जगताप,उमेश शिर्के, नानासो पासगे, तानाजी पिंगळे ,गणेश शिर्के, प्रकाश शिर्के, सलीम पठाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
close