shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मतदार याद्या मधील हरकती दाखल करण्याचे अवाहन...!


प्रतिनिधी – एरंडोल आज दि . 03 नोव्हेंबर 2021 रोजी 16 एरंडोल मतदार संघात असणाऱ्या एरंडोल तालुक्यात 137 ,पारोळा तालुक्यातील 123 व भडगांव तालुक्याती 30 अशा एकुण 290 मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांचे मार्फत प्रारूप मतदार याद्या या प्रारूप मतदार याद्यांच्या संदर्भात 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या . दि . 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत . तसेच नवीन मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिमेचा कालावधी दि .13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी असणार आहे . तद्नंतर दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी हा दि . 20 डिसेंबर 2021 पर्यंत ठेवण्यात आला असुन दि . 05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे . तरी , सदर कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात ग्रामसेभेचे आयोजन करून त्यात मतदार याद्यांचे वाचन करुन एकाच व्यक्तीचे दोनदा आलेले नांव मृत व्यक्तीं , गांव सोडून गेलेली व्यक्ती किंवा अन्य मतदारयादीत नांव असलेली सर्व नावे यावेळी ग्रामसेवक यांनी पुरावे घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने कमी करावयाची आहेत . त्यामुळे या बाबत तमाम जनतेने दखल घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन 16 एरंडोल संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल विनय गोसावी व सहा . मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांनी केले आहे .
close