shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहीद जवानाच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन..!



पाचोरा प्रतिनिधी दि. १८ :-  तालुक्यातील  सावखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय-३५) हे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा बजावीत असतांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
पाचोरा तालुक्यातील मंगलसिंग परदेशी यांना नुकतेच वीरगती प्राप्त झाली. वीर जवान जवान मंगलसिंग परदेशी हे दसर्‍यानिमित्त १का महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आले होते. त्यानंतर ते देशसेवेसाठी पठाणकोट येथे हजर झाले होते. मात्र त्यांना वीरगती प्राप्त झाल्याने परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामातअंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबई येथे असल्याने आज त्यांनी सावखेडा बुद्रुक येथे जाऊन हुतात्मा परदेशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी हुतात्मा मंगलसिंग परदेशी यांचे आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी यांचे सांत्वन केले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
close