shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकार शौकत शेख यांचा सत्कार ..!



श्रीरामपूर । प्रतिनिधी: - १६ नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथील समता हॉलमध्ये ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान या़च्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे,समाजात घडणाऱ्या विविध बाबींना पत्रकार हा आपल्या लेखणीद्वारे आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रतिबिंबित करत समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करत असल्याचे इब्राहिम बागवान म्हणाले,तसेच हाजी फयाजभाई बागवान आणि ओबीसी ऑर्गनायझेशन पदाधिकाऱ्यांच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू- भगिनींना यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या.

याप्रसंगी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शौकत शेख,समता आरटीओ ऑनलाईन सर्व्हिसेसचे सरताज शौकत शेख, ओबीसी ऑर्गनाईझेशनचे जिल्हा सचिव इब्राहीम बागवान,संघटक जाकीर शाह, कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी,सहसचिव अजीजभाई अत्तार, सहसचिव सरदारभाई (राजू) कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
close