shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्याच्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात आणखी नव्याने पडलीय भर, घुलेंची कन्या होणार गडाखांची सून..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
नेवासा  : बऱ्याच दिवसांपासून चर्चा असलेली नगर जिल्ह्यातील एक राजकीय सोयरिक अखेर जुळून आल्यामुळे जिल्ह्याच्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात आणखी नव्या समिकरणांची भर पडली आहे.
त्यामळे येत्या विधानपरिषद निवडणुकीत नातेसंबंधांची झलक पाहायला मिळणार आहे. दरम्यान जिल्हा हा राजकीय सोयरीकमुळे नेहमीच चर्चेत राहिला असून आणखी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सोयरिक झाली आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. 
उदयन यांनी नगरमध्ये तर निवेदिता यांनी पुण्यात शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदयन नेवासा तालुक्यात राजकारणात सक्रिय झाले आहेत.
नगर जिल्हा सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. सर्वच पक्षातील अनेक नेते एकमेकांचे सोयरे आहेत.एक नवीन समीकरण जुळून आले आहे.
गडाख आणि घुले यांचे विधानसभा मतदारसंघही शेजारी शेजारी आहेत. महाविकास आघाडीमुळे राजकीयदृष्ट्याही ते एकत्र आलेले आहेत.
नातेसंबंध बाबत सावरासावर व झलक येत्या विधानपरिषद निवडणुकीत चांगलीच रंगणार असून आपल्याला ती पहावयास मिळणार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close