shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मौर्य क्रांती संघ आयोजित,तिसरी धनगर जागृती परिषदपरिवर्तन यात्रेचे इंदापुर मध्ये भव्य स्वागत.

मौर्य क्रांती संघ आयोजित,
तिसरी धनगर जागृती परिषद
परिवर्तन यात्रेचे इंदापुर मध्ये भव्य स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:मौर्य क्रांती संघ आयोजित तिसरी धनगर जागृती परिषद मौजे जेजुरी, ता. पुरंदर जि. पुणे येथे दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न होत आहे.त्या पार्श्वभूमीवर  दि. १७ आॅक्टोबर २०२१ रोजी यवतमाळ येथून या परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली होती. ती परिवर्तन यात्रा एकुण ३२ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आली. त्यावेळी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेचे स्वागत करून रॅली प्रदर्शन केले.
   यावेळी मौर्य क्रांती संघाचे तालुका अध्यक्ष अजित शेंडगे,  सुर्यकांत पुजारी ,  पप्पू पवार, सुरज धाईंजे, संतोष क्षीरसागर, महेश लोंढे, विजय चव्हाण, पोपट आठवले, बलभीम राऊत, अॅड. किरण लोंढे, वसिम शेख, आझाद सय्यद, नागेश भोसले, इम्रानभाई बागवान, अक्षय मखरे,गणेश चंदनशिवे, भारत चंदनशिवे 
 व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
     धनगर बांधवांची वैचारिक जागृती करून त्यांच्या मधे इमानदार नेतृत्व निर्माण करणे हा या परिवर्तन यात्रेचा उद्देश आहे. असे मत  सत्यवान दुधाळ (अध्यक्ष - मौर्य क्रांती संघ, पश्चिम महाराष्ट्र) यांनी व्यक्त केले. या परिवर्तन यात्रेचे नेतृत्व  प्रतापदादा पाटील (राज्य महासचिव, मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र) हे करत आहेत.

यावेळी प्रतापदादा पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, धनगर समाज हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या स्थानावर असूनही लोकसभेत एकही खासदार नाही. तसेच विधानसभेत ही लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व नाही. धनगर जमात ही राज्यकर्ती जमात होती. ती आज मागणाऱ्यांच्या ओळीत आली आहे. ज्यांची संख्या महाराष्ट्रात एक ते दीड टक्के आहे आणि देशात साडे तीन टक्के आहे. त्यांनी पाच राष्ट्रीय पार्ट्या बनवून बहुसंख्य समाजाला तिकीटं वाटप करण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य असणारे त्यांच्याकडे निवडणूकीच्या वेळी तिकीटं मागतात, ही शोकांतिका आहे.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नितीन देशमाने यांनी केले आणि प्रास्ताविक संजय (डोनाल्ड) शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल मारकड यांनी केले.
close