shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर तालुका अध्यक्षपदी पूनम निंबाळकर यांची निवड.अंगणवाडी संघाच्या नुतन कार्यकारीनीस सर्वोतपरी सहकार्य करणार - माजी उपसभापती देवराज जाधव

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर तालुका अध्यक्षपदी पूनम निंबाळकर यांची निवड.

अंगणवाडी संघाच्या नुतन कार्यकारीनीस सर्वोतपरी सहकार्य करणार - माजी उपसभापती देवराज जाधव.
इंदापूर प्रतिनिधी:दि १८ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर शाखेची नुतन कार्यकारीनी निवड निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंदिरात पार पडली.यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य देवराज जाधव , पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन दुधाळ , माजी उपसभापती शालनताई भोंग , ग्रा पंचायत सदस्या सोनाली जगताप , नाभिक संघटनेचे अध्यक्ष संतोष जगताप , बहुजन परीषद इंदापूरचे अध्यक्ष बिभिषण लोखंडे , प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय राऊत यांचे हस्ते करण्यात आला.बहुजन परिषद इंदापूर तालुका महिला आघाडी प्रमुख पदी सुरेखा राहुल मिसाळ यांची निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.
अंगणवाडी संघटनेस सर्वोतपरी सहकार्य करून त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू असे माजी उपसभापती देवराज जाधव यांनी सांगितले.यावेळी मोहन दुधाळ , शालनताई भोंग , घनःशाम निंबाळकर , बिभिषण लोखंडे व अंगणवाडीसेविका मधून उषा सावंत , सविता माने यांनी मनोगते व्यक्त केली.नुतन अध्यक्षा पुनम निंबाळकर यांनी संघटनेतील सदस्यांना सन्मानाची वागणूक देवून संघटनेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले संघटनेचे १२५ सदस्यांना नोंद झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पुनम निंबाळकर , उपाध्यक्षपदी तुळसा जाधव , सचिवपदी तनया जाधव , कार्याध्यक्षपदी श्री निक्ते व मुख्य सल्लागारपदी शुभांगी शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक तुळसा जाधव यांनी केले.आभार शुभांगी शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले.यावेळी तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
close