shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलास मारहाण करणार्या त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
"अल्पवयीन मुलास मारहाण करणार्या त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे ; अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे पोलिस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली."

मुंबई : अल्पवयीन मुलास अमानुषपणे मारहाण करणार्‍या त्या निर्दयी व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे पोलिस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समाज माध्यमावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक निर्दयी वडिलाने जो आपल्या मुलाला दांड्याने मारतोय, त्या लहान मुलाची बहीण त्या निर्दयी वडिलांना विनवणी करत आहे. पप्पा नका मारू दादाला, दादा रडू नको तरीही हा निर्दयी बाप त्या मुलाला दांड्याने मारत आहे.. कोण आहे निर्दयी व्यक्ती याला शिक्षा झाली पाहिजे, असा संताप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो. 
 
या व्हायरल होणार्‍या व्हिडिओची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. व्हिडिओतील संवाद मराठीतील असल्याने हा प्रकार महाराष्ट्रातच घडला असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. 

या व्यक्तीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाला अमानुषपणे मारहाण करणार्‍या या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close