अहमदनगर प्रतिनिधी :
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यप्रेरनेतून प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका व आदर्श नवनिर्माण फाउंडेशन आडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, दिवाळीच्या निमित्ताने सलग तीनवर्षांपासून याही वर्षी देखील एक दिवा शहीद बांधवांसाठी हा कार्यक्रम साकारण्यात आला. भारतीय सीमेवर वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या स्मूर्ति'प्रीत्यर्थ पणत्यांच्या दिव्यांची रोषणाईने भारतीय तिरंगा व ध्वज उजाळून,राहाता तालुका माजी सैनिक संघटनेच्या, सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते या ऐतिहासिक प्रतिमेचे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी भारत मातेचा आणि उपस्थित सेवानिवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर शिर्डी येथील श्री साई सावली अनाथ आश्रमातील चिमुकल्या अनाथ बांधवांसोबत यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली व या अनाथ आश्रमात विविध खाद्यपदार्थ आणि आश्रम उपयोगी वस्तू तसेच किराणा देऊ केला.
या कार्यक्रमासाठी माजी सैनिक मेजर धापटकर, मेजर लक्ष्मण शिंदे, मेजर सुनिल देशमुख, मेजर आदिनाथ राहिंज उपस्थित होते
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके, तालुका संघटक वसंत काळे, दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष नितीन भन्साळी, प्रहार राहाता तालुका मार्गदर्शक मेजर सुनील देशमुख, तालुका सल्लागार सेवानिवृत्त मुख्याधिकारी गुळवे, राहाता शहराध्यक्ष अविनाश सनासे, प्रहारचे साकुरी शाखाध्यक्ष सतीश रोहोम, नांदुखी शाखाध्यक्ष विक्रम दाभाडे, प्रहार सेवक योगेश मगर, निमगाव शाखाध्यक्ष सचिन आरने, आदर्श फाउंडेशचे प्रशांत कडलग, पवन शेळके, संकेत बोधक, शुभम गमे यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम सम्पन्न झाला.

