अहमदनगर प्रतिनिधी :
सोशल तरुणाई फाऊंडेशनच्या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मायेची ऊब" उपक्रम महाराष्ट्रभर पोहोचतोय. दिनेश जवरीलाल राठोड सह महाराष्ट्रामधील प्रमुख २५ शहरांमध्ये २५ टीम काम करत आहे. सोशल तरुणाई फाऊंडेशन" ने मायेची ऊब हा उपक्रम हाती घेतला आहे. ह्यात स्त्रियांसाठी साड्या, लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी कपडे विविध ठिकाणावरून जमा करून निराधार लोकांपर्यंत पोहचवण्याच काम तरुणाई टीम व सहकारी करत आहेत.
तसेच अमरावती विभागातून निशा मुकुंद मेश्राम सह मुकुंद मेश्राम, निर्मला मुकुंद मेश्राम, पुष्पा रमेश मेश्राम, अमित मेश्राम, सुनय मेश्राम, आशुतोष तुमाने, काजल बोरकर, शुभम ठाकरे, अक्षय वरहेकर, हिमांशू जैन, कुणाल यादगिरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन निराधारांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यांना सहकार्य करत प्रभाकर वासनिक, सीमा वासनिक, खुशी वासनिक व समस्त वासनिक परिवार यांनी त्यांच्याकडून गरजू लोकांसाठी दिवाळी फराळ देण्याच कार्य त्यांनी केल आहे. ज्या लोकांनी आमच्यापर्यंत कपडे पोहोचविले आमची मदत केली आम्हाला साथ दिली त्या सगळ्यांचे खूप खूप मनःपूर्वक आभार सदर मायेची ऊब या उपक्रमाला महाराष्ट्रभरातून चांगलं प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक केले असे दिनेश राठोड म्हणाले.

