shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेतील आणखी एकाचा मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा  प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१
अहमदनगर  : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गोदाबाई पोपट ससाणे (वय ७० वर्षे रा वांगदरी ता. श्रीगोंदा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.
या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. त्यातच मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने करून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close