संगमनेर । प्रतिनिधी: ऋषिकेश जगताप:-
गेल्या एक महिन्यापासून महावितरणकडून चालू असलेला शेतकऱ्यांसोबत लपंडाव त्याला कंटाळून शेतकरी वर्ग आणि शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ,बाबासाहेब कुठे, यांची साकुर येथे गुरुवारी महावितरण केंद्रावर आंदोलन करण्यात आले.
व महावितरणकडून शेतकऱ्यांना का त्रास दिला जातो व शेतकऱ्यांचाच वीज मध्ये का कपात केली जाते असे जाब विचारून जर शेतकऱ्यांना विजेचा विद्युत पुरवठा सुरळीत चालू नाही झाला तर महावितरण केंद्रावर शिवसेना स्टाईल आंदोलन होईल. असे संगमनेर शिवसेना अध्यक्ष.बाबासाहेब कुठे यांनी इशारा दिला व शेतकऱ्यांचा छळ कपाट कर्ण थांबवावं. अन्यथा यानंतर जे काही होईल त्याला महावितरण केंद्र जबाबदार असेल असा इशारा बाबासाहेब कुठे यांनी दिला.

