shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्या जवळ सी आर पी एफ जवानाला अज्ञात वाहन चालका सह दोन व्यक्तींनी लुटून मारहाण केली..!

एरंडोल /वार्ताहार :- तालुक्यातील भालगाव फाट्याजवळ सी आर पी एफ  जवान सुट्टीवर घरी पारोळा येत असताना  वाहन चालकासह दोन अज्ञात इसमांनी रात्री एक वाजेच्या सुमारास रोख रक्कम सह मोबाइल्स हिसकावून चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पसार झाले. 
      एरंडोल शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर CRPF मध्ये सेवेत असलेले, श्रीकांत शांताराम माळी वय 43 राहणार प्लॉट नंबर 19 सावित्री नगर शिवाजी हायस्कूल समोर पारोळा येथील रहिवासी सी आर पी एफ वॉटर कॅरियर या पदावर मिलिटरी सेवेत आहे .यांची नेमणूक 58 बटालियन वरंगल तेलंगणा येथे सेवेत असताना ,त्यांची २७ दिवस रजा मंजूर झाल्याने दिनांक 18 नोव्हेंबर रोजी ते ट्रेन ने जळगाव येथे आपल्या घरी पारोळा येथे जाण्यास निघाले असता, रात्री तेवीस वाजून 40 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथून रिक्षाने आकाशवाणी चौफुलीवर आले असता पारोळा जाण्यासाठी वाहनांना हात घेऊन थांबलो असताना 19 नोव्हेंबर च्या सकाळी बारा वाजून पंधरा मिनिटांनी लाल रंगाचा तवेरा वाहन थांबले ,वाहन चालकाने सदर जवानाला मी धुळे येथे जात असून तुम्हाला ८० रुपयात पारोळा येथे सोडतो असे सांगितल्यावर ते वाहनात बसून पारोळा येथे जाण्यास निघाले .एरंडोल शहर च्या पुढे आल्यावर दादाश्री पेट्रोल पंपावर डिझेल भरून पारोळा कडे निघाले असता ,रात्री एक वाजून 15 मिनिटांनी भालगाव फाटा येथे त्यांच्या ताब्यातील तवेरा कंपनीचे वाहन रस्त्याच्या कडेला लावले व  वाहन चालकासह दोन अज्ञात इसमांनी मला खाली उतरवून  मारहाण करून तिसऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे चाकूचा धाक दाखवून माझ्याकडील पाकीट पैसे मोबाईलची मागणी करू लागले .त्यानंतर मी त्यांना  विनंती  केली कि मला मारू नका  एका इसमास सह  मारहाण केली तर वाहन चालकाने माझ्या उजव्या डोळ्यावर जोराचा बुक्का मारून तिघांनी माझ्याकडील मोबाईल पाकीट बळजबरीने हिसकावून घेतले व त्यानंतर मला भालगाव फाट्यावर सोडून माझ्या जवळीलतीन तीन हजार किमतीचा OPPO SMARTPHONE A5 S मॉडेल  काळ्या रंगाचा मोबाईल, त्यात जिओ (jio)व एअरटेल कंपनीचे असे २ सिम कार्ड ,याबरोबर माझ्या पाकिटात असलेले 3500 रुपये ,ओळख सीआरपीएफचे( CRPF) आयकार्ड, सीआरपीएफचे फॅमिली हेल्थ कार्ड, स्टेट बँकेचे ४ एटीएम, पॅन कार्ड, आधार कार्ड यासह १लाल रंगाची लगेच बॅग त्यातील खाकीवर्दी कंबाईन वर्दी, बेल्ट कम्बाईन टॉपिक अँपल इतर साहित्य सहमाझी वैयक्तिक कागदपत्रे असलेली फाईल असे एकूण रक्कम 6500 रुपये घेऊन ते  वाहनासोबत  पारोळा कडे पळून गेले. त्यानंतर मी होटेल गुरुकृपा येथे पायी चालत जाऊन तेथील मालकाला झालेली घटना घरी सांगण्यासाठी  त्यांच्याकडील मोबाईल वरून माझा भाऊ विनोद शांताराम माळी राहणार पारोळा यास फोन लावून घडलेली घटना सांगितली त्यानंतर माझा भाऊ मला घेण्यास आल्याने मी भाऊसोबत पारोळा येथे निघून गेलो. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी मी पोलिस स्टेशनला हजर राहून वाहनचालकव दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . लगेच एरंडोल पोलिसांनी आपले तपास चक्रे फिरवून आरोपीना लवकरच पकडण्यासाठी  शोध मोहीम सुरू केलेली आहे ,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक  तुषार देवरे हे तपास करीत आहे.
close