shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोठी बातमी:महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१

कोरोनाचा  धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली
असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’ असं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच, राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.


 
कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला दिले आहे.

तसंच, मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. पण, आता लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.


 
दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.

शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close