shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील दिलीप सातपुते याला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन केला मंजूर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१

अहमदनगर : अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणातील दाखल गुन्ह्यात शिवसेनेचा माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते याला शनिवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दि.22 ऑक्टोबर रोजी पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौकात छापा टाकून बायोडिझेल कारवाई केली होती. यावेळी एकूण 72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक गिरीश मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सातपुते यांच्यासह 25 आरोपींची नावे समोर आली आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातपुत पसार झाला होता.
त्याने अ‍ॅड.सतीष गुगळे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान सातपुते यांच्यासह या गुन्हयात नाव असलल्या इतरांनीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close