shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील "या" डेपोतून ११ बस विविध ठिकाणी मार्गस्थ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१
शेवगाव : राज्यात सर्वाधिक शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले होते. आज वाढीव पोलीस बंदोबस्तात ११ बस मार्गस्थ झाल्या. मात्र दुपारी पुन्हा नेावासाकडे जाणार्‍या बसवर दगडफेक झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.शेवगाव आगारातून सर्वाधिक ३७ बस शुक्रवारी सुरू झाल्या होत्या. मात्र शुक्रवारी १ तर शनिवारी दोन बसवर दगडफेक झाली. यामुळे बस वाहतुक ठप्प झाली होती. आज आगारातून
     अधिकच्या पोलीस बंदोबस्तात अंशतः प्रवाशी वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली. येथील आगारातून दुपारी दोन वाजे पर्यंत एकूण ११ बस विविध ठिकाणी मार्गस्थ झाल्या. त्यात पैठण ०३ ,पुणे, नगर, गेवराई व नेवासा प्रत्येकी ०२ बसचा समावेश आहे.

      पंरतु आज दुपारी पुन्हा शेवगाव येथुन नेवासा कडे निघालेल्या एसटी बसवर (बस क्रमांक एम एच – ४० एन ८८९५) अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली.

या घटनेत बसच्या पुढील बाजूची काच फुटली असून चालक दत्तात्रय नारायण काकडे यांच्या छातीला मार लागला असून या अवस्थेतही त्यांनी आपली बस पुन्हा शेवगाव आगारात आणून आगारातील वरिष्ठ अधिका-यांना घटनेची माहिती दिली.
जखमी बसचालक काकडे यांच्यावर शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close