शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अपहरणाची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत ही तिसरी घटना आहे. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडिलानी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर १७ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरात झोपली होती.
मध्यरात्री त्या मुलीच्या आईला जाग आली. तेव्हा मुलगी जागेवर नसल्याचे दिसून आले. सदर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घरातील लोकांनी त्या मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
कोणीतरी त्यांच्या
मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

