shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथील ‘तो’ सराईत गुन्हेगार अखेर कोपरगाव पोलिसांनी केला जेरबंद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात अनेक चोरीच्या, दुचाकी पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. आता पोलिसांना कारवाई करण्यात मोठे यश आले आहे.
कोपरगाव शहरातून दुचाकी चोरणारा गोटुंबे आखाडा (ता. राहुरी) येथील सराईत गुन्हेगार पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय 25) असे सदर गुन्हेगाराचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास अटक केली आहे. कोपरगावमधील रहिवासी मच्छिंद्र परसराम पोकळे यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरटयांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोकळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
 
सदर दुचाकी मंचरे याने चोरली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. पोलीस निरीक्षक अनिल कटके  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, शंकर चौधरी, संतोष लोढे, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, उमाकांत गावडे यांच्या पथकाने आरोपी मंचरे याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

आरोपी मंचरे विरोधात कोपरगाव शहर , संगमनेर  , कर्जत  , राहाता , लोणी  , जालना   तालुका (जि. जालना) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.
सराईत गुन्हेगार ताब्यात घेतल्याने पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close