shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार रमेश जेठे यांनी पिंपरी-चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील वडार मजूर दाम्पत्य शिल्पाला दिली भेट..!!


वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने नरसिंहराव गुंजी (हैद्राबाद); शिवरूद्राय स्वामी बेंगलोर (कर्नाटक) व रमेश जेठे यांचा करण्यात आला सन्मान...!

पिंपरी-चिंचवड :- येथील बर्ड व्हॅली उद्यानात असलेल्या वडार मजूर दाम्पत्य शिल्प एक वैशिष्ट्य पुर्ण शिल्प आहे. ते पहाण्यासाठी देशभरातील पर्यटक आवर्जून येतात. येथील हे शिल्प आकर्षक  मनमोहक, मनाला आनंद देणारे असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असे शिल्प यानंतर कुठेही नाही. 

सविस्तर माहिती अशी की, या ठिकाणी पुर्वी तीन लोकांच्या मालकी हक्क असलेल्या मोठ मोठ्या वडार समाजाच्या दगडाच्या खाणी होत्या. तेथील दगडखाणील पुर्ण दगड काढल्यामुळे तीन खाणींचे अखंड एकच खाणीत रुपांतर झाले आहे. त्यानंतर दगड संपल्यानंतर व तसेच परिसरात शहर वसल्यामुळे सदर खाण शासनाकडुन बंद करण्यात आले.त्यानंतर येथे बारमाही नेहमीच पाणी साठलेले असायचे. यानंतर येथे  पिंपरी-चिंचवड महापालिकेने बर्ड व्हॅली उद्यानाची निर्मिती केली. 

त्याचदरम्यान येथील वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शामराव विटकर व कार्यकर्ते यांनी वडार समाजातील स्मृती कायम स्मरणात राहाण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती केली की, आमचा वडार समाज काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे.येथे वडार समाजाची दगडखाण होती. ज्यांनी देशाच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. अशा लोकांची एक खरी खूरी आठवण कायम रहावी यासाठी वडार मजूर दाम्पत्य शिल्प बसविण्यात यावे यासाठी मन धनाने विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालीकेने सदर शिल्प आकर्षक, मनमोहक रितीने बसवून वडार समाजाजी मान उंचावली. यासाठी वडार समाजाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला शतशः धन्यवाद ..!
सदर शिल्प पहाण्यासाठी देशभरातील पर्यटक आवर्जून येतात व येथील नयनरम्य सौंदर्याचा दिलखुलासपणे आनंद घेतात. 

यावेळी नरसिंह राव गुंजी, मुख्य सल्लागार - ओसिसिआय, नवी दिल्ली, रहिवाशी हैद्राबाद
शिवरुद्राय स्वामी - निवृत्त आयकर अधिकारी आणि जनरल सेक्रेटरी - ओसिसिआय, नवी दिल्ली रहिवाशी बेंगलोर ( कर्नाटक), शिर्डी ऐक्सप्रेसचे संपादक-रमेश जेठे यांनी येथे येऊन परिसराची पहाणी करुन वडार मजूर दाम्पत्य शिल्पाला भेट दिली. येथील तलावाच्या परिसरातील सौंदर्य पाहून आनंदित झाले. पाण्यावर चालणार्या बोटींचा मनमोहक दृश्य पाहून आनंद व्यक्त केला.

या ठिकाणाला सर्वांनी  जीवनात एकदा तरी भेट द्यावी, आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही..!

या प्रसंगी वडार मजुर शिल्प प्रतिष्टानच्या वतीने सन्मानिय पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
close