shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी फॅक्टरी येथील अहमदनगर जिल्हा बँक शाखेच्या इमारतीचा पडविचा कठडा कोसळला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१


राहुरी : येथील अहमदनगर जिल्हा बँक शाखेच्या इमारतीचा कर्मचारी रहिवासी असलेल्या पडविचा कठडा कोसळून वित्तहानी झाली असून कोणालाही दुखापत झाली नाही.

 फॅक्टरी येथे जिल्हा बँकेची शाखा असून या शाखेची भव्य बिल्डींग असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर बँकेचे कर्मचारी वास्तव्यास आहे. ही बिल्डींग जीर्ण अवस्थेत आहे. रात्री ८ वाजता इमारतीच्या मागील बाजूचा पडवीचा कठडा अचानक कोसळला. यामुळे मोठा आवाज झाला. 
त्यामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांनी आवाज ऐकून मोठी गर्दी केली. या घटनेत मोठी वित्तहाणी झाली आहे. मात्र कुठलीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close