राहाता । प्रतिनिधी :
अ.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र माळवदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, भाजपा ओबीसी युवामोर्चा राहाता तालुका अध्यक्षपदी एक युवा व कृतीशील नेतृत्व जितेंद्र माळवदे यांच्या माध्यमातून मिळाले आहे, व राज्य सरकारकडून ओबीसी समाजावर होत असलेला सातत्याचा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक संघर्षात व लढ्यात मी भाजपा ओबीसी मोर्चाच्या बरोबर आहे. असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

