शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपण कोरोना लस घेणार नाही, असं जाहीर केलं होतं. पण, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अखेरीस इंदुरीकर महाराज यांची समजूत काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांनी कोरोनाची लस घ्या, असं आवाहन करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं.
त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपण इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. अखेरीस आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इंदुरीकर महराजांची जालन्यात भेट झाली. जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला राजेश टोपे यांनी हजेरी लावून भेट घेतली. या भेटीनंतर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याचे कीर्तनातून आवाहन करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाहीतर जालना येथील कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी प्रत्येकांनी लस घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं आहे
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

