shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : साकुर सेंट्रल बँकेचा अनोखा उपक्रम ; ग्राहक स्वतः करणार पासबुक प्रिंट..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
संगमनेर : तालुक्यातील साकुर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेत ग्राहकांच्या सेवेसाठी बँक शाखाधिकारी मनिषा नवले यांच्या संकल्पनेतून स्वयंचलित बँक खाते पुस्तक छपाई हा अनोखा नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेषता संगमनेर तालुक्यात हा पहिला उपक्रम आहे. या उपक्रमाचा नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी कृषी वित्त अधिकारी सुनील मोटे, मुख्य कॅशियर संजय पेंडभाजे, क्लार्क विजय डोळस, शकील मिस्तरी आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे बँक ग्राहकांना डिजिटल ऑनलाईन सेवेचा स्वतः अनुभव घेता येणार आहे. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांवरचा ताणही कमी होणार आहे. आता ग्राहकांना जर आपले पासबुक प्रिंट करायचे असेल तर सेंट्रल बँकेत जाऊन स्वतःही करू शकणार आहे. यामुळे ग्राहकांना बँकेत रांगेत उभे न राहता आपला वेळही वाचवता येणार आहे. 

साकुर सेंट्रल बँकेशी पठार भागातील साधारणता 20 ते 25 गावांचा आर्थिक व्यवहाराशी संपर्क येत आहे. परिसरातील शाळा, ग्रामपंचायत, बचत गट, पतसंस्था, व्यापारी वर्ग, आदींचे मोठ्या प्रमाणात व्यवहार सेंट्रल बँकेत होत असतात. तसेच पठार भागात सेंट्रल बँक एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असल्याने बँकेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सेंट्रल बँकेच्या शाखाधिकारी मनिषा नवले यांच्या संकल्पनेतून तसेच बँकेत होणारी गर्दी लक्षात घेता सेंट्रल बँकेत स्वतंत्र स्वयंचलित बँक खाते पुस्तक छपाई (पासबुक प्रिंट) सेवा सुरू केली आहे. जेणेकरून याचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. तरी ग्राहकांनीही पासबुक प्रिंट करण्यासाठी बँकेत येऊन या सेवेचा स्वतः लाभ घ्यावा असे आव्हान साकुर सेंट्रल बँक शाखेच्या शाखाधिकारी मनिषा नवले यांनी केले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close