शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
सिव्हील हॉस्पीटलच्या आयसीयु विभागातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेशंटला वाचवण्याचे प्रयत्न केले नाही ११ जणांना गमवावे लागले प्राण, म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल....जिल्हा पोलीस अधिक्षकांची पत्रकार परिषदेत दिली माहीती.
अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसीयू विभागात आग लागलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी नेमणुकीस असलेला महिला वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका या उपस्थित नव्हत्या. आग लागली त्या परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे हॉस्पीटलच्या सिसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत नसल्याने कर्तव्यात कसूर व जबाबदारी या कर्मचाऱ्यांनी टाळली त्यामुळे या चार कर्मचाऱ्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली आहे.असे एसपी यांनी सांगीतले.
प्राथमिक तपासामध्ये जी परिस्थीती दिसून येत आहे त्यानुसार आयसीयू मध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांसोबत कोणताही वैद्यकीय अधिकारी आणि इतर स्टाफ उपस्थित नव्हता, आग लागल्यानंतर आणि धूर येत असताना स्टाफ आतमध्ये आलेला दिसून येत नाही स्वतः रुग्ण स्वतःचे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास्क स्वत हाताने काढून बाहेर येत आहेत. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये एक वैद्यकीय महिला अधिकारी आणि तीन परीचारिका-परिचारक यांना अटक केली असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

