shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्महत्येची धमकी देणाऱ्या लाईनमनवर बुमरँग उलटले..!!

आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या लाईनमनलाच इंजिनिअरने गुन्हा दाखल करून दिला 'शॉक'!!!जोर का झटका धिरसे लगे...

--------------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची सोशल मिडियावर देणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञावर अभियंत्याने पोलीसात गुन्हा दाखल करून शॉक दिला आहे. त्यामुळे आता आत्महत्येची धमकी देणाऱ्या तंत्रज्ञावर बुमरँग उलटले आहे.



या बाबतची माहिती अशी की, केज येथील वीज वितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले मयूर देवीदास राऊत या कर्मचाऱ्याने दि. १० नोव्हेंबर रोजी व्हाट्सअप्पवर मित्रांना पाठविलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, केज विज वितरण कंपणी कार्यालय, उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. सी. अंबेकर यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत आहे. अंबेकर हे सतत टार्गेट करून विनाकारण निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. तसेच मयूर राऊत हा कामा निमित्त त्यांच्या कार्यालतात गेल्यास त्याला तो कार्यालयात का आला? अशी विचारणा करून; त्याला  एक लाख रु. दे. अन्यथा त्याला निलंबित करण्याची धमकी देत आहेत. तसेच त्यांची वरिष्ठा पर्यंत पोहोच असल्याने त्यांचे कुणी काही करू शकत नाही. अशी धमकी देत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तो आत्महत्या करीत असल्याचा मेसेज मयूर याने त्याच्या मित्रांना मोबाईलवर पाठविला. त्या नंतर एकच खळबळ उडाली होती. 


दरम्यान या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता अंबेकर यांनी दि.११ नोव्हेंबर केज पोलीस ठाण्यात मयुर राऊत याच्या  विरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तंत्रज्ञ मयुर राऊत हे कुंबेफळ आणि इतर गावात कार्यरत आहे. राऊत हे त्यांच्या दृष्टीस पडताच अंबेकर यानी त्यास वीज बिलाच्या थकीत बाकीची ग्राहकाकडून वसुली मोहीम चालु आहे. गणवेश का घातला नाही . अशी विचारणा करून अंबाजोगाईला गेले. नंतर दुपारी ४:५६ वा. सुमारास कंपनीचे कामकाजासाठी जनमित्र नावाचे व्हाट्सअप्प ग्रुपवर मयुर देविदास राऊत यांने आर. सी. अंबेकर यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या करत आहे. तसेच त्यांनी एक लाख रुपये मागत आहे. अशी खोटी पोस्ट व्हायरल करुन विनाकारण बदनामी केली आहे. अशी तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करून व्हाट्सअप्पवर आत्महत्येची देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञावरच बुम रँग उलटले आहे. मयुर राऊत याच्या विरुद्ध भा.दं.वि. ५०० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे करीत आहेत.




उपविभागीय कार्यालय केज येथे त्यांच्या माझ्या अधीपत्याखाली तंत्रज्ञ म्हणुन कुबेफळ व इतर गावी नेमणुकीस असलेला मयुर देविदास राऊत हा दिसला मी त्यास वसुली मोहीम चालु आहे कंपनीचा गणवेश का घातला नाही अशी विचारणा करून अंबाजोगाईला गेलो नंतर दुपारी 16.56 वाजण्याच्या सुमारास भी कंपनीचे कामकाजासाठी जनमीञ नावाचे Whats App Group केज उपविभागासाठि तयार केलेल्या ग्रुपवरती मयुर देविदास राऊत यांनी मी आर . सी अंबेकर यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या करत आहे तसेच एक लाख रुपये मागत आहेत अशी खोटी पोस्ट करुन विनाकारण बदनामी केली आहे . म्हणून माझी मथुर देविदास राऊत रा . केज यांचविरुदध फिर्याद आहे .



वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी मयुर राउतचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्या सर्वांनी कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलीस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप पर्यंत सदर कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार केज पोलीस ठाण्यात दिलेली नसल्याने अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडुन मिळाली आहे.



फिर्याद दि . 11/11/2021 मी , राजेश चंद्रकांतराव आंबेकर वय 51 वर्षे व्यवसाय नौकरी उपकार्यकारी अभीयंता म.रा.वि.वि.कं.म. केज रा . अंबाजोगाई जि . बीड जात गाडीलोहार मो.नं. 7875762323 समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवून फिर्याद देतो की मी वरील ठिकाणचा राहणारा असुन मी सण 2018 रोजी पासुन महावितरण कंपनीच्या केज येथील कार्यालयामध्ये उपकार्यकारी अभीयंता म्हणून काम करतो . दि . 10/11/2021 रोजी दुपारी 15.15 वा सुमारास अंबाजोगाई येथे बैठकीसाठी जात असताना उपविभागीय कार्यालय केज समोर माझ्या अधीपत्याखाली तंत्रज्ञ म्हणुन कुबेफळ व इतर गावी नेमणुकीस असलेला मयुर देविदास राऊत हा दिसला मी त्यास वसुली मोहीम चालु आहे कंपनीचा गणवेश का घातला नाही अशी विचारणा करून अंबाजोगाईला गेलो नंतर दुपारी 16.56 वाजण्याच्या सुमारास भी कंपनीचे कामकाजासाठी जनमीञ नावाचे Whats App Group केज उपविभागासाठि तयार केलेल्या ग्रुपवरती मयुर देविदास राऊत यांनी मी आर . सी अंबेकर यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या करत आहे तसेच एक लाख रुपये मागत आहेत अशी खोटी पोस्ट करुन विनाकारण बदनामी केली आहे . म्हणून माझी मथुर देविदास राऊत रा . केज यांचविरुदध फिर्याद आहे . हि फिर्याद दिली ती माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलीखीत केली असून ती मी वाचून पाहीली माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे . मा . पोनी सो यांचे आदेशाने पुढील तपासकामी सफौ 380 गुजर यांना देण्यात आला .
close