मुंबई, महाराष्ट्र- सध्या एसटी महामंडळ कर्मचार्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरू असुन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेने सदर आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असुन लोकशाही असलेल्या भारत देशातील आपण नागरिक असल्याने कोणत्याही घटकावर अन्याय होत असेल पाठपुरावा करुन देखील सबंधित विभाग मागण्या मान्य करत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही हे देखील तितकेच खरे आहे...! म्हणुन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे म्हणजे खर्या अर्थाने संबंधित कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाने वापरलेले दबावतंत्रच म्हणावे लागेल...!
(आज आमदार खासदार यांचे मानधनात भरमसाठ वाढ करून घेऊन तसेच आमदार खासदारांचे पेन्शनवर मोठा खर्च होत असूनही कोणी चकार शब्द काढत नाहीत..!कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते यांचे स्वतःचे मतलब त्यात लपलेले असल्यामुळे देश व राज्य कर्जबाजारी असले तरी मानधन व पेन्शन रक्कम कमी करा आणि देशातील व राज्यातील समस्या कमी करण्यासाठी कोणीही पुढे येऊन बोलत नाहीत ही देशाची खरी शोकांतिका आहे.)
तातडीने सबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करून
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नांसंदर्भात परिवहन मंत्री या नात्याने चर्चात्मक मार्गाने सदर आंदोलन हाताळणे आवश्यक आहे, एसटी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड तणावाखाली असुन सामान्य नागरिकदेखील आंदोलन सुरु झाल्यापासून खुप त्रास सहन करत आहेत...!
प्रशासनाने सदर आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चर्चात्मक मार्गाने सोडवुन
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.. अशी मागणी मा.अनिलजी परबसाहेब, मा.परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे 🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष, शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

