शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल चक्क पैशे मागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पैशे भरा अन्यथा जखमींना घरी हलवा अशी भूमिका शहरातील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलने घेतली असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी कोविड Icu वार्डला शॉर्ट सर्किटने आग लागली होती.या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यात जखमी झालेल्या ७ जणांना शहराच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेली यमुनाबाई कांबळे या रुग्णाला उपचारासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलें होते मात्र तेथेच अग्नीतांडव झाल्याने आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्या संबधित हॉस्पिटलने पैशे द्या अन्यथा रुग्णाला हलवाची भूमिका घेतली असल्याचा आरोप खाजगी हॉस्पिटलने केला आहे असा आरोप संबधित नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान संबधित रुग्णांना महात्मा फुले योजने अंतर्गत सर्व खर्च हे प्रशासन करत असून या प्रकरणाची माहिती घेवून कार्यवाही करण्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक रामटेके यांनी दिली आहे
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

