shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर जिल्हयातील भयानक घटना; डॉक्टर ने केला सख्ख्या भावावर गोळीबार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१
श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथे एका डॉक्टरने सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 
बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले पथकासह घटनास्थळी हजर झाले. डॉ. विजय देवीचंद मुनोत आणि मनोज देविचंद मुनोत या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ढिकले यांनी दिली आहे. डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. मनोज मुनोत यांना उपचारासाठी दौंड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती खालावल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवावे लागेल असे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. जखमी डॉ. विजय मुनोत यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे तर मनोज मुनोत यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. ज्या रिव्हॉल्वरमधुन गोळीबार करण्यात आले ते रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close