shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना करण्यात आले वंदन..!


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:
आज दि 17/11/2019 रोजी हिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यात आले.आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर मुख्यमंत्री पदी उद्भवसाहेब ठाकरे म्हणजेच एका शिवसैनिकाला बघून त्यांना फार आनंद झाला असता अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.


यावेळी शिवसैनिकांच्या घोषनांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. याप्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते कमलाकर कोते,काँग्रेसचे डॉक्टर एकनाथ गोंदकर,राष्ट्रवादी चे महेंद्र शेळके,माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके,बाबासाहेब कोते,शिवसेना तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे,शहरप्रमुख सचिन कोते,उपशहरप्रमुख राहुल गोंदकर,दिनेश शिंदे,सुयोग सावकारे, प्रसाद पाटील,विश्वजित बागुल,अमोल गायके,पुंडलिक बाबके,नितीन कोते, अनिल पवार,संतोष जाधव आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close