शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१
प्रवारानगर : पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी तालुका राहाता येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर या शाळेतील प्राथमिक विभागातील इयत्ता दुसरी च्या वर्गातील विद्यार्थी “सत्यजित नितीन थेटे” याची बालकलाकराची प्रमुख भूमिका असलेल्या “वायली” या लघुपटास 'गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल२०२१' मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे
लघुपटाची कथा,लिखाण व दिग्दर्शन प्रणव मोहन वाणी यांनी केले आहे आपापल्या पालकांमधील मतभेद आणि वाढत्या वादामुळे दोन चुलत भावांच्या सुंदर नात्यावर कसा विपरीत परिणाम होतो हे या लघुपटामध्ये दाखवलेले आहे बालवयातच सत्यजित याचे पोवाडे सादर करण्याची कला तसेच शिवाजी महाराज यांच्या बद्दल चे प्रेम,वकृत्व स्पर्धेत हिरीरीने भाग घेणे,सुत्रसंचालन करणे या सर्व गोष्टी लहान वयातच शाळेमध्ये करत होता. या सर्व गोष्टींमुळेच त्याला या लघुपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे.
या लघुपटाची निवड लंडन, मध्य प्रदेश,पुणे अशा अनेक ठिकाणी झाली अजून काही फेस्टिवल्स मध्ये हा लघुपट दाखवणार आहेत आणि काही दिवसातच तो प्रदर्शित देखील होणार सत्यजित थेटे ह्याला याकरिता शाळेच्या संचालिका लीलावती सरोदे प्राचार्य दीप्ती आडेप, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीमा आहेर-बडे वर्गशिक्षिका शितल आहेर आदि. शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे. आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे,खासदार सुजय दादा विखे यांनी सत्कार देखील केलेला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

