महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा उद्या इंदापुरात-
स्वप्निल सावंत.
इंदापूर प्रतिनिधी: केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा हे पुणे जिल्ह्यामध्ये सध्या चालू असून उद्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता इंदापूर येथे संविधान चौकात येणार आहे त्यानंतर इंदापूर शहरांमधून यात्रा मुख्य बाजारपेठेत जाऊन पुढे नगरपालिकेच्या प्रांगणात सभा होणार असल्याची माहिती इंदापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की या सभेसाठी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा निरीक्षक सौ. उत्कर्षा रुपवते व दादू शेठ खान तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
आगामी नगरपरिषद,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे महागाईच्या रथयात्रेबरोबर उपस्थित काँग्रेसचे नेते मंडळी जनसमुदायास सभेमध्ये काय संबोधित करतील याच्याकडे लक्ष राहणार आहे.

