shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकला शेतात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे...

गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील कैसर तय्यबजी फार्म येथे परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकण्यात आला.
         
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दावेद नागेय्या कंदामला, वय २८ रा. गजवेल, ता. सिद्धीपेठा, राज्य तेलंगणा या तरुणाच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२,२०१९ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दावेद कंदामला यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा चुलत भाऊ यादगीर कनकैय्या, वय ३२ रा. नारमेटा, जि. सिद्धपेठ,राज्य तेलंगणा याचा १३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान कुणीतरी अज्ञात आरोपीने गळा दाबून जिवे ठार मारुन खून केला. आणि मृतदेह शेती गट नं. ८९ मध्ये फेकून देण्यात आला.
          
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, डिवायएसपी संदीप मिटके, पोनि संजय सानप यांनी भेट दिली. परप्रांतिय तरुणाचा कोणी खून केला? का केला? याचा पुढील तपास पोनि सानप हे करीत आहेत.
\

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close