शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
खैरी निमगाव जवळ मोटारसायकल अपघातात ०३ गंभीर जखमी;उपचारासाठी दोघांना नगरला हलवले…
खैरी निमगाव जवळ मोटारसायकल अपघातात ०३ गंभीर जखमी;उपचारासाठी दोघांना नगरला हलवले…
श्रीरामपूर : तालुक्यातील खैरी निमगांव येथील हरेगाव कॉर्नरजवळ दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ श्रीरामपूर येथील साखर कामगार येथे दाखल केले.त्यानंतर त्यातील दोघांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले.
श्रीरामपूरहून येणाऱ्या MH१५ GT ८६३१ बजाज सिटी १०० या गाडीने गोंडेगाव येथील महावितरण कर्मचारी दादासाहेब थोरात व भाऊसाहेब थोरात हे MH१७ CN ६३३४ यांच्या हिरो स्प्लेंडर प्लसला श्रीरामपूरकडे जात असताना समोरासमोर धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहे.सुरूवातीला त्यांना उपचारार्थ साखर कामगार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.त्यानंतर त्यातील दोघांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले.
हरेगाव कॉर्नर या ठिकाणी तसेच त्यापुढे हायस्कुल असल्याने याठिकाणी गतीरोधकांची आवश्यकता आहे.तसेच श्रीरामपूर - पुणतांबा रस्ता वळणाचा असल्याने येथे दिशादर्शक फलक आहेत. मात्र ते अनेक ठिकाणी झाडामुळे दिसत नाहीत. याबाबत बाधंकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या अपघातप्रसंगी उपस्थीत प्रत्यक्षदर्शीमध्ये सुरु असलेल्या चर्चेतुन समजते की, या दोन गाड्यामध्ये एक फोरव्हिलर मॅजीक गाडी होती. ती गाडी बाजुला होताच समोरासमोर हा अपघात घडला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

