राहता । प्रतिनिधी : दिल्ली येथील पद्म पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर विमानाने शिर्डी विमानतळावरून दिनांक 12 रोजी सौ राईबाई पोपेरे यांचे आगमन झाले श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दुपारी अडीच वाजता आल्या असता त्यांचा सत्कार ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आला.
ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात गेल्या वर्षी पासून फॅमिली हेल्थ गार्डन विषमुक्त भाजीपाला हा घरा जवळील मोकळ्या जागेत कंपोस्ट खताच्या साह्याने उत्पादित करण्याचा आगळा वेगळा प्रयोग यशस्वी केलेला आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज "पद्मश्री" बीजमाता सौ राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते रोपाचे पूजन करून त्यांना माहिती देण्यात आली. "पद्मश्री" राहीबाई पोपेरे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन श्री भरतजी दवंगे साहेबांच्या हस्ते करण्यात आला, त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी अन्नमाता सौ ममता भांगरे यांचा सत्कार श्री जितेंद्र शेळके सर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यांच्याबरोबर असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री जतिन साठे यांचा सत्कार श्री ताराचंदभाऊ कोते पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
बीजमाता राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या कोंभाळणे गावातील रहिवासी आहेत महिला शेतकरी आणि पारंपारिक वाहनांचा बियाणांचा वाणांचा संरक्षक-संवर्धक आहेत, देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने देऊन 20 20 मध्ये गौरवले आहे त्यांना आतापर्यंत बीबीसी 100 महिला प्रभावी म्हणून गौरविण्यात आले आहे.
नारी शक्ति पुरस्कार 20 19 मध्ये मिळाला आहे. देशी वाणांची बियाण्यांची बँक ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन त्यांनी स्वतःचे व गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा "सीड मदर" म्हणजेच बीज माता म्हणून उल्लेख केला आहे 'पद्मश्री' सौ राहीबाई यांच्याकडे जुन्या गावठी पालेभाज्या फळे व वेलांच्या बिया जतन करण्याचे कार्य केलेले आहे त्यांनी शेत्मजुर महिला व शेतकरी यांचे साठी बचत गटाची स्थापना केली आहे त्यांचा आदर्श घेऊन ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांच्या सदस्यांनी भाजीपाला व फळे यांचे सेंद्रिय पद्धतीने दोन वर्षापासून उत्पादन घेतले आहे म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचा योग श्री साई बाबाच्या कृपेने जुळून आला.
यावेळी ग्रीन ॲंण्ड क्लीन शिर्डी फाउंडेनचे कॅप्टन अजित भाऊ पारख सचिव जितेंद्र शेळके सर सदस्य दादासाहेब काळे श्री सचिन तांबे ताराचंदभाऊ कोते पाटील श्री महेश वैद्य श्री मनीलाल पटेल श्री धनंजय जगताप श्री संजय शिर्डीकर संतोष महेर मनोज वाघ नितीन शिंदे श्री नंदलाल मोटवानी उपस्थित होते.

