shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भिंगार पोलिसात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भिंगार पोलिसात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक चौक ते बुर्‍हाणनगर रस्त्या दरम्यान सोमवारी (दि.9) ही घटना घडली. अशोक राठोड (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही डीएसपी चौकातून बुर्‍हाणनगरकडे जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून पाठलाग करुन, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे म्हणत रस्त्यात अडविले. तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

भिंगार पोलिसांनी या प्रकरणी अशोक राठोड याच्याविरोधात विनयभंगासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय नगरे करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close