shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसटी संपाचा प्रवाशांना मोठा फटका, बहीणीला सासरी पाठवताना भाऊरायाच्या खिशाला ताण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करावा यासह विविध मागण्याचा विचार करावा यासाठी मागील सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यानी संप पुकारला असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना मनस्ताप घडत आहे. आज सात दिवस झाले कर्जत बसस्थानक परिसरात “लालपरीचे” दर्शन झाले नाही. तर बसस्थानक परिसर प्रवाशांशिवाय ओस पडले आहे.
     : दादा भाडे जरा कमी करा की, गरीब बहीण आहे !
भाऊबीजेसाठी अनेक बहिणी माहेराला आल्या होत्या. मात्र एसटी संपाचा मोठा फटका त्यांना बसला. बसस्थानक परिसरात काही तरी वाहन मिळेल या आशेने बराच वेळ ताटकळत प्रवाशी उभे राहत आहे. मात्र एसटी मिळत नसल्याने त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. वाढती इंधन महागाई त्यात एसटीचा संप असल्याने खाजगी वाहनांनी आपले भाडे वाढवले असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना ते न परवडणारे ठरत आहे. त्यात एका बहिणीने थेट चालकांलाच “दादा भाडे जरा कमी करा की, गरीब बहीण आहे !” अशी आर्त दिल्याने चालक देखील काही काळ स्तब्ध झाला होता.
2) पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक कर्जतमध्ये
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या उपलब्ध साधनांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी परिवहन विभागाकडून बस स्थानकात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सहायक मोटार परिवहन निरीक्षक गोरक्ष कोरडे यांनी बुधवारी कर्जत बसस्थानकास भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close