शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेच्या कामाला आज महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी दिली.
घुले म्हणाल्या की, शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेच्या कामास गेल्या दोन वर्षांपासून कामाला मंजुरी मिळावी, यासाठी मी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ पाथर्डी दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही या योजनेच्या कामास तातडीने मंजुरी देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला होता. या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम मंजूर झालेले आहे.
ही योजना मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, असे घुले यांनी सांगितले.या योजनेमुळे दोन्ही तालुक्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

