प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील चार मंडळापैकी उत्राण मंडळ वगळता एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, या तिन्ही मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. उशिरा रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू झालेला अवकाळी पाऊस संपूर्ण तालुक्यात पहाटे पर्यंत सुरू होता तालुक्यात सरासरी 70:75 एम एम पावसाची नोंद करण्यात आली आहे.
उशिरा रात्री सुरू झालेला पाऊस एरंडोल मंडलात अतिवृष्टी होऊन 101 एम.एम. रिंगणगाव मंडळात 81 एम. एम, कासोदा मंडळात 66 एम एम तर उत्राण मंडळात 35 एम.एम.पावसाची नोंद करण्यात आली असून तालुक्यात सरासरी 70: 75 पाऊस झाला आहे.या पावसाने रब्बी पिकांना फायदा तर वेचणीचा कापसाचे व काढणी पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात रब्बी हंगामाला सुरवात झाली आहे. हरबरा , मका, सूर्यफूल, ज्वारी व गहू पिकांची पेरणी ही सुरू आहेत. अवकाळी पावसाचे सावट येणाऱ्या काळात कायम असल्याने गहू पेरणी कडे शेतकरी मागील वर्षाचा तुलनेने पाठ देत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. अश्या शेतकऱ्यांना रात्रीचा पावसाने पिकांना एक पाणी देण्याचे काम ठळल्याने फायदा झाला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकताच पेरणी केलेला गहू हरभरा यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या पिकांच्या उगवणीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांवर गहू, हरभरा या पिकाची दुबार येऊ शकते पेरणीची वेळ येऊ शकते.
मका काढणी बाकी शेतकऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे.तसेच वेचणीचा कापसाचे नुकसान झाले आहे. सुरवातीलाच मजुरीचे दर वाढले आहेत. त्यात अश्या अवकाळी पावसाने त्यात कापूस वेचणीला अधिकचा खर्च लागत आसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.दरम्यान या अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार उपसमिती मध्ये व्यापारी मंडळी चा उघड्यावर पडलेला मक्याचे नुकसान झाले आहे. तसेच विटाभट्टी चे हि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

