shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवरदेवाला दिल्या रस्त्यातच भेटून शुभेच्छा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवरदेवाला दिल्या रस्त्यातच भेटून शुभेच्छा.


नवरदेवाच्या पूर्वीच मंत्री मंगल कार्यालयात हजर ! शेवटी रस्त्यात गाठूनचं दिल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा


इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर शहरातील मधुकर चव्हाण यांचा मुलगा जयवंत चव्हाण यांचा यवत येथील समृद्धी लॉन्स येथे सकाळी ११ वा. ३४ मि या शुभमुहूर्तावर विवाह होता.या विवाहाचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निमंत्रण होते.


 नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सकाळीच पुण्याहून इंदापूरच्या दिशेने निघाले जाताना चव्हाण परिवाराच्या विवाह सोहळ्यास भेटून भरणे यांना इंदापूर तालुक्यातील नियोजित कार्यक्रमांस भेट द्यायची होती. भरणे यवत येथील समृद्धी लॉन्स येथे पोहचले परंतु या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की नवरदेव आणि व्हराडी मंडळीच अजून विवाहस्थळी आले नाहीत. त्यावर त्यांनी त्वरित संपर्क साधून नवरदेव जयवंत यांची पाटस येथे रस्त्यावरचं भेट घेतली आणि भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार, बाबासाहेब चौगुले व इतर मंडळी उपस्थित होते.

यातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आपुलकीचे दर्शन दिसून आले आहे
close