shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वनगळी येथील पारेकर वस्ती नजीक शिवशंकर उर्फ राजू मोरे यांच्या शेतामध्ये लांबलचक उसाचे उत्पादन.लांबलचक उसाचा फोटो पाहून शेतकरी आणि सोशल मीडिया पाहणार्‍यांना कडून होत आहे कौतुक.

वनगळी येथील पारेकर वस्ती नजीक शिवशंकर उर्फ राजू मोरे यांच्या शेतामध्ये लांबलचक उसाचे उत्पादन.

लांबलचक उसाचा  फोटो पाहून शेतकरी आणि सोशल मीडिया पाहणार्‍यांना कडून होत आहे कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील पारेकर वस्ती नजीक गट नंबर ८४/२ मधील शेतकरी व उच्चशिक्षित शिवशंकर उर्फ राजू विश्वनाथ मोरे यांनी २६५ या जातीच्या उसाची लागवड दिनांक १६ जुलै २०२० रोजी केली असून या उसाला एकरी ५० पिशव्या कोंबड खत ८ एकर क्षेत्रात ४०० पिशव्या तसेच ग्रोमर रासायनिक खत एकरी २३ पिशव्या प्रमाणे ८ एकर क्षेत्रात १८४ पिशव्या टाकले आहेत. तसेच उसाला टॉनिक म्हणून ग्रोमोर स्पो न्टा चे तीन फवारण्या केलेले आहेत. सदर उसाची तोड दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ पासून चालू असून ऊसतोड चालू झाल्यापासून एका उसाला ५२  कांड्या आलेल्या दिसत आहेत. 
सदर ऊस एका माणसाने हातात घेतला असता त्या उसाचे दोन्ही टोक जमिनीवर ती टेकले जात आहेत. उसाची लांबी पाहता सदर ऊसा बाबत जाणून घेतले असता ऊस बागायतदार शिवशंकर मोरे यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सदर उसाची तोड चालू असताना दहा गुंठ्यात पहिली खेप भरली. या खेपाचे वजन  २३ टन  भरले आहे . तसेच ऊस तोडीच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना विचारले असता सदर उसाच्या फडात अशा प्रकारचे ऊस जास्त प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. 
सदर उसाच्या जाडी बाबत विचारले असता या उसाला एक महिना वीज तोड केल्यामुळे पाणी न मिळाल्याने जाडी मध्ये फरक पडला असल्याचे शेतकरी शिवशंकर मोरे यांनी सांगितले. शिवशंकर मोरे यांनी सदर ऊस पिकाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, या उसाला जिवापाड सांभाळ असून असा ऊस प्रथमच मी पाहिला असल्याने या पिकाचे विशेष मला अभिमानास्पद कौतुक वाटत आहे.
close