प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- आज एरंडोल शहरात शिवसेनेच्यावतीने दोन गटांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल ट्विटरवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे नितेश राणे यांना अटक करण्यात यावी याबद्दल निवेदन देण्यात आले व दोन्ही गटांणी नितेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दुपारी एक वाजेच्या सुमारास समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन व शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शहर प्रमुख कुणाल महाजन व युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. आम्ही राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात भाजपाचे प्रदेश सचिव निलेश नारायण राणे याने काल अतिशय खालच्या दर्जाचे आक्षेपार्ह ट्विट केले. त्याच्या निषेधार्थ आज एरंडोल शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने निलेश राणे याच्या पुतळ्याचे धरणगाव चौफुली येथे दहन करण्यात आले, यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी निलेश राणे याच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. याप्रसंगी बोलताना तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी निलेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार करताना सांगितले की निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत, एका जबाबदार लोकप्रतिनिधी विषयी बोलताना एवढ्या हीन पातळीवर वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे, तथापि राणे कुटुंबीयांकडून सुसंस्कृत पणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल... राणे कुटुंबीयांनी कोणावरही टीका करताना आपला भूतकाळ विसरू नये आज जे काही त्यांच्याकडे आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या जोरावर हे त्यांनी विसरू नये.यावेळी काहीकाळ रास्तारोको देखील करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्याकडे निलेश राणे याच्याविरोधात फिर्याद देण्यात येऊन योग्य ती कारवाई करून अटकेची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुका संघटक माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, नगरसेवक चिंतामण पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, राजेंद्र महाजन, परेश बिर्ला, विकी खोकरे, सुनील चौधरी, ऍड. प्रेमराज पाटील, अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, प्रसाद महाजन, राजेश महाजन, जयेश महाजन, गणेश चौधरी, गोविंदा बिर्ला, चेतन महाजन, राजू महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच दुसऱ्या गटा तर्फे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली गुलाबरावजी पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्या बद्दल आमदार नितेश राणे यांच्या वर गुन्हा दाखल होण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वात एरंडोल सहा पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आले या वेळी जगदीश पाटील, रवि जाधव,महानंदाताई पाटील(महीला आघाडी जिल्हाप्रमुख),सरिता मंत्री,रवि चौधरी,(उप ता.प्रमुख)दिनेश आमले,(लोकनियुक्त सरपंच जवखेडे सिम)नानाभाऊ महाजन,प्रसाद दंडवते, दे चुंनीलाल राठोड(उप सरपंच आनंदनगर तांडा),गौरखनाथ भदाणे,राजेंद्र पाटील(शहर प्रमुख),हर्षल पाटील,गोपाल महाजन,गजानन महाजन,प्रमोद महाजन,संदीप महाजन,रतन पाटील(ग्रा.प.सदस्य),महेश महाजन,एकनाथ महाजन,नितीन महाजन,प्रकाश महाजन,गणेश मराठे,सुनील मानुधने,रुपेश माळी,रवींद्र वाघ,प्रदीप महाजन,संजय महाजन,निलेश मराठे (ग्रा.प.सदस्य),नितीन महाजन,सलमान पठाण, जीत महाजन,पवन महाजन,जेरीलाल महाजन,राकेश महाजन,संदीप चौधरी,मनोज माळी,आरिफ मिस्त्री,शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होतेतसेच शिवसेना,युवासेना,महीलाआघाडी पदाधिकारी शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

